शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

गोवर-रुबेला लसीकरण बालकांसाठी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:24 IST

विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर-रुबेलालस पूर्णत: सुरक्षित आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : २१ दिवसात ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर-रुबेलालस पूर्णत: सुरक्षित आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. महानगरपालिका स्थायी समिति सभागृहात सीटी टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने गोवर रुबेला निर्मूलन मोहिमेत आजवर झालेल्या कामांचा आढावा व पुढे करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचे नियोजन सादर करण्यात आले. बालकांचे संरक्षण करणाºया लसीकरण मोहिमला २७ नोव्हेंबरपासून उत्साहाने प्रारंभ झाला. रूबेला लसीकरणाचे ७५ टक्के लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शाळांमधील लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. पुढील आठवड्यात शाळाबाह्य मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शेवटी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांकडे लक्ष केंद्र्रित करण्यात येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विविध ६५ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील म्हणजेच १० वी पर्यंतच्या सर्व मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येत असून नागरी आरोग्य केद्रनिहाय शाळांमध्ये लसीकरण करण्याचे सुयोग्य नियोजन महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जात असून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान कुठल्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्यास १०८ रूग्णवाहिकेची व्यवस्था मनपाकडून करण्यात आली आहे. आतापर्यंत गोवर रुबेला लसीकरण झालेली सर्व बालके सुरक्षित असून याबाबत सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.इंदिरानगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबूपेठ नेताजी चौक, भिवापूर सुपर मार्केट, तुकूम येथील आरोग्य केंद्रांवर एमआर लसीकरण केल्या जात आहे. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष शैलेश बागल, आयएमए अध्यक्ष प्रमोद राऊत, डॉ. निवृत्ती जीवने, डॉ. नरेंद्र जनबंधू, शिल्पा मुळे, शोभा वानखेडे, लीनी बांगडे, मनोज येलमुले, अपर्णा कोल्हे, सुनीता कुळमेथे, सुकेशिनी बिलवणे, पुष्पा बनसोड, मंजुषा वºहाटे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. राजुरवार, डॉ. आकुलवार, डॉ. गर्गेलवार डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य