हळद लागवडीसाठी उत्तम बियाणांचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:29 IST2021-05-13T04:29:16+5:302021-05-13T04:29:16+5:30
मागील हंगामामध्ये हळदीला बाजारामध्ये चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भात, कापूस, ...

हळद लागवडीसाठी उत्तम बियाणांचा वापर करावा
मागील हंगामामध्ये हळदीला बाजारामध्ये चांगला भाव मिळाला. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भात, कापूस, तूर, सोयाबीन यांचा सामावेश होतो. पीक पद्धतीमध्ये बदल ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी क्रियाकल्प आणि हँड होल्डिंग अत्यंत आवश्यक आहे. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळद लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले असून, बियाणे, इतर निविष्ठा, तसेच हळद निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे यासाठी अनुदान दिले जाते. कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक अशी हळदीची ओळख आहे. आहार, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधन आणि धार्मिक विधी यासाठी हळदीचा वापर होतो. जमिनीचा कस वाढविणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असणे, तसेच रानडुकरांचा उपद्रव कमी असतो. चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त प्रदेशात हे विशेष महत्त्वाचे आहे. हळद पिकाचे फायदे खूप आहेत. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय असणार आहे.
येथे मिळेल बियाणे
हळद लागवडीकरिता ‘प्रगती’ या वाणाचे बियाणे शेतकरी उत्पादक कंपनी कवडू ॲग्रो फार्मर प्रोड्युसर मूल, नितेश येनपरेड्डीवार, संगोपन फार्मर, ग्रामसमृद्धी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, चंदनखेडा येथील महेश नागापुरे कांचनी फार्मर, वरोरा येथील बालाजी धोबे मानिकादेवी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर सालोरी, सुनील बावणे कृषकोन्नती कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, टेंमुर्डा विक्रेते मरस्कोल्हे बाखर्डी फार्मर प्रोड्युसर कंपनी कोरपना संदीप काकडे यांच्याकडे उपलब्ध असून, संपर्क क्रमांकावर संपर्क साधून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन राहुल कर्डिले यांनी केले आहे.