खूशखबर, आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४३७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:17+5:302021-01-01T04:20:17+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७४ हजार ५२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ४८ हजार ८३२ नमुने ...

The good news is, there are now only 437 active patients | खूशखबर, आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४३७

खूशखबर, आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ ४३७

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७४ हजार ५२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ४८ हजार ८३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

गुरुवारी मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरातील ५२ वर्षीय व ४० वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६६ बाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १०, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

गुरुवारी बाधित आलेल्या ३७ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १२, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपूर दोन, भद्रावती आठ, ब्रह्मपुरी एक, नागभीड एक, सिंदेवाही दोन, पोंभुर्णा एक, राजुरा एक, चिमूर पाच, वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: The good news is, there are now only 437 active patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.