राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : लग्नानंतर काही महिन्यांत मुलीची होणारी प्रसूती नार्मल की सिझरिंग असा प्रश्न सासरकडील व माहेरील मंडळींना नेहमीच पडलेला असतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबाला पैशाची कमतरता भासत असते. मात्र, आता मुलीची सिझरिंग प्रसूती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. कारण आता मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात सिझरिंगची प्रसूती मोफत केली जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात ४० ते ५० हजार रुपये होणारा खर्च टळला आहे. वैद्यकीय खर्च म्हटले तर सर्वांची घाबरगुंडी उडत असते. कारण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना खासगी दवाखाना म्हणजे ताप असतो. त्यामुळे सरकारी दवाखान्यात जास्तीत जास्त उपचार करण्यासाठी सामान्य जनता येत असते. उपजिल्हा रुग्णालय मूल येथे आता प्रसूतीचीही शस्त्रक्रिया होत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयात ४० ते ५० हजार रुपये मोजावे लागतात. गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकाला एवढी रक्कम परवडणारी नसल्याने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे मोफत सिझरिंग प्रसूती करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वल इंदूरकर यांनी खासगी महिला स्त्रीरोग तज्ज्ञांशी चर्चा करून सिझरिंग प्रसूती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
उद्दिष्टापेक्षा जास्त शस्त्रक्रियासन २०२१-२२ या वर्षात कोरोनाचा काळ असतानादेखील प्रसूती शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ६० देण्यात आले होते. ते पार करून तब्बल ८३ सिझरिंग प्रसूती करण्यात आली होती. सन २०२२-२३ या वर्षातील एप्रिल व मे या महिन्यात १० केसेस होणे अपेक्षित असताना १७ सिझरिंग प्रसूती करण्यात आल्या आहेत.
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे मोफत सिझरिंग प्रसूती केली जात आहे. यासाठी रुग्णालयात एक दिवस अगोदर भरती होणे आवश्यक आहे. सदर ऑपरेशन करीत संबंधित यंत्रणा तयार करणे व रुग्णाची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते. -डॉ. उज्ज्वल इंदूरकरवैद्यकीय अधीक्षक मूल.