आनंदाची बातमी; २८ सप्टेंबरपासून बल्लारशाह-गोंदिया पॕॅसेंजर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:30 IST2021-09-25T04:30:24+5:302021-09-25T04:30:24+5:30

नागभीड : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. येत्या २८ सप्टेंबर २०२१ पासून बल्लारपूर - नागभीड - ...

Good news; Ballarshah-Gondia passenger will run from September 28 | आनंदाची बातमी; २८ सप्टेंबरपासून बल्लारशाह-गोंदिया पॕॅसेंजर धावणार

आनंदाची बातमी; २८ सप्टेंबरपासून बल्लारशाह-गोंदिया पॕॅसेंजर धावणार

नागभीड : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. येत्या २८ सप्टेंबर २०२१ पासून बल्लारपूर - नागभीड - गोंदिया ही पॕसेंजर गाडी सुरू होणार आहे. नागभीड येथील रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून ही पॕसेंजर बंद आहे. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही पॕसेंजर सुरू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. पण रेल्वे प्रशासन ही पॕॅसेंजर सुरू करण्याचे नाव घेत नव्हते. परिणामी प्रवाशांना पदरमोड करून अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत होता. अखेर प्रवाशांचा दबाव वाढल्यानंतर ही पॕॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून २८ सप्टेंबरपासून ही पॕॅसेंजर सुरू होत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Good news; Ballarshah-Gondia passenger will run from September 28