गोंडकालीन किल्ल्याचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:46 IST2018-05-26T22:46:10+5:302018-05-26T22:46:39+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपुरातील गोंडकालीन किल्ल्यांचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. काळाच्या ओघात जीर्ण होत चाललेल्या किल्ल्याकडे काही वर्षांपासून पर्यटकाने पाठ फिरविली होती.

गोंडकालीन किल्ल्याचा होणार कायापालट
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बल्लारपुरातील गोंडकालीन किल्ल्यांचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. काळाच्या ओघात जीर्ण होत चाललेल्या किल्ल्याकडे काही वर्षांपासून पर्यटकाने पाठ फिरविली होती. किल्ल्याची दुरवस्था आणि किल्ल्याच्या परिसरातील वाढत चाललेल्या कचऱ्यामुळे शहर विद्रूप झाले. त्यामुळे न. प. ने पुढाकार घेऊन गोंडकालीन किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी पुरातत्त्व विभागांशी सामंजस्य करार केला. या करारानुसार गोंडकालीन किल्ल्याचा कायापालट होणार आहे. त्यामुळे पर्यटकाचा ओढा किल्ल्याकडे वाढणार आहे.
नगराध्यक्ष हरीश शर्मा, वनविभाग महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्याधिकारी विपीन मुदधा आदींनी पर्यटकांसाठी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने या मोहिमेची माहिती पुरातत्व अधिकाºयांना दिली. गोंडकालीन किल्ल्यांचे पालटलेले स्वरूप पाहुन अधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणाला सहमती दिली.
भारतीय पुरातत्व विभागाने किल्ल्यावर पर्यटकासाठी नगर परिषदेद्वारे सुविधा पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर २४ मे ला स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रादेशिक संचालक नागपूरचे नबी रान, पुरातत्त्व अधीक्षक हाशमी, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, न. प. चे अभियंता संजय बोढे, इको प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.
सदर कराराद्वारे नगर परिषदतर्फे किल्ल्यावर एम. एस.चे प्रवेशद्वार, किल्ल्यातील विहिरीवर लोखंडी जाळी, राणी महल खिडक्यांकरिता एम.एस. च्या ग्रील पायºयांवर व झेंडा वंदनेच्या जागेवर एम.एस. रेलिंग राणी महलच्या बाजुला एम.एस. रेलिंग, आर.ओ. कुलरद्वारे पाण्याची व्यवस्था, पर्यटकाकरिता बेंचेस, सोलार दिवे, किल्ल्याबाहेरील परिसरात े शौचालय व प्रसाधनगृह, बगीचा आणि अन्य विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहे.