गोंडवाना विद्यापीठाने परीक्षक, पेपरसेटर मॉडरेटरचे मानधन द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:36+5:302021-01-17T04:24:36+5:30
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे होणाऱ्या विविध परीक्षांकरिता अनेक विषयातील प्राध्यापकांची परीक्षक व मॉडरेटर म्हणून नियुक्ती केली जाते. यामध्ये ...

गोंडवाना विद्यापीठाने परीक्षक, पेपरसेटर मॉडरेटरचे मानधन द्यावे
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाद्वारे होणाऱ्या विविध परीक्षांकरिता अनेक विषयातील प्राध्यापकांची परीक्षक व मॉडरेटर म्हणून नियुक्ती केली जाते. यामध्ये नियुक्त प्राध्यापकाच्या वतीने विविध परीक्षासंबंधीचे कार्य अत्यावश्यक सेवा म्हणून तत्परतेने केली जातात. मात्र, या कामाचे मानधन थकीत आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन देण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलसचिव व परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गोंडवाना विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयातील प्राध्यापकवृंद अनेक वर्षांपासून परीक्षक, पेपरसेटर व मॉडरेटर म्हणून कार्य करीत आहेत. मात्र अनेक सत्रातील झालेल्या परीक्षेचे मानधन प्राध्यापकांना मिळाले नाही, असा आरोप गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केला. शिष्टमंडळाने परीक्षा नियंत्रक डॉ. चिताडे यांची भेट घेतली. यासंदर्भात डॉ. चिताडे यांनी लेखाधिकारी व सहायक कुलसचिवांशी चर्चा करून प्रलंबित मानधन काढून देण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. विवेक गोरलावार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे, डॉ. राजू किरमिरे, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. श्रीराम गहाणे, विभाग समन्वयक प्रा. नीलेश हलामी, डॉ. प्रफुल्ल बनसोड, डॉ. अभय लाकडे प्रा. किशोर कुडे, डॉ. लक्ष्मण कांबळे, डॉ. राजुरवाडे, डॉ. गजभिये यांचा समावेश होता.