गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टद्वारा धरणे
By Admin | Updated: September 14, 2015 00:46 IST2015-09-14T00:46:13+5:302015-09-14T00:46:13+5:30
वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय’ हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टद्वारा धरणे
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयाला ‘राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय’ हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर शहराची निर्मिती राणी हिराई या गोंड महाराणीने केलेली आहे. तसेच महाराष्ट्राची पहिली महिला प्रशासक म्हणून त्यांचा नामोउल्लेख केला जातो. चंद्रपुरातील अनेक वास्तु त्यांची साक्ष देत आहे. महाकाली मंदिराची स्थापना राणी हिराई यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त देवी महाकालीच्या दर्शनासाठी येतात, असे अनेक अतुलनीय कार्य व समाज उपयोगी कार्य राणी हिराई यांनी केले आहे. रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी वैद्यूची नेमणूक केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी राणी हिराई आदर्श आहे. वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थी डॉक्टर होऊन लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडेल, तेव्हा राणी हिराई यांचे कार्य ते डोळ्यासमोर ठेवणार. चंद्रपूर शहरातील विरासत ही गोंड राजाची असूनसुद्धा कोणत्याही ठिकाणाला गोंडराजा घराण्यातील व्यक्तीच नाव नसणे ही एक शोकांतिका आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील आठ लाख आदिवासी बांधवांच्या भावनांचा आदर ठेवून वैद्यकीय महाविद्यालयाला राणी हिराई वैद्यकीय महाविद्यालय हे नामकरण करण्यात यावे. या मागणीसाठी गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी चंद्रपुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनाला गोंडाराजे समाज सुधारक ट्रस्टचे अध्यक्ष गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम, कुमुद जुमनाके, संतोष मेश्राम (भुमक), रजनी परचाके, छाया तलांडे, डॉ.आनंद किन्नाके, शिला कुळमेथे, विना पेन्दाम, शोभा कन्नाके, आनंदाबाई आत्राम, तारा अडकाम, छाया मसराम व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)