गोंडपिपरीत क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:50+5:302021-01-13T05:12:50+5:30
ठाणेदार संदीप धोबे यांनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १५ षटकांच्या सामन्यात पोलीस संघ सरस ठरला. या दरम्यान ...

गोंडपिपरीत क्रिकेट स्पर्धा
ठाणेदार संदीप धोबे यांनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १५ षटकांच्या सामन्यात पोलीस संघ सरस ठरला. या दरम्यान शारीरिक कवायत तसेच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी समाजात करावयाच्या कर्तव्याची जाण ठाणेदार संदीप धोबे यांनी करून दिली. गोंडपिपरी पोलीस स्टेशनमार्फत पोलीस वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात विविध विभागातील कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, इच्छुक खेळाडू सहभागी झाले होते. उपस्थितांना सायबर क्राईम, मुला–मुलींवर होणारे अत्याचार व सुरक्षितता याबाबत ठाणेदार संदीप धोबे यांनी मार्गदर्शन केले. वाहतुकीचे नियम या संदर्भात मनोहर मत्ते यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अजित जैन, विनोद लभाने, नितेश डोंगरे, अमोल दुर्योधन, लिंगलवार, राजूरकर, नैताम, स्नेहल फुलझेले, विवेक राणा उपस्थित होते.