गोंडपिपरीत कर्मचाऱ्यांनी राबविले स्वच्छता अभियान
By Admin | Updated: November 11, 2014 22:38 IST2014-11-11T22:38:52+5:302014-11-11T22:38:52+5:30
येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गोंडपिपरीत कर्मचाऱ्यांनी राबविले स्वच्छता अभियान
गोंडपिपरी : येथील पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसर स्वच्छ करित स्वच्छता अभियान राबविले. सदर अभियानास कर्मचारी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी यंदाचे वर्ष स्वच्छता अभियानाचा आगळावेगळा उपक्रम देशात लागु केला. सदर उपक्रमात देशपातळीवर नेते, अभिनेते, राजकीय पुढारी अधिकारी यांनी ठिकठिकणी स्वच्छता अभियान राबवून पंतप्रधानाच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. देशस्तरावर चाललेल्या याच उपक्रमाचा आदर्श ठेवत जिल्हास्तर व ग्रामीण स्तरावरही स्वच्छता अभियान राबविला जात असुन स्थानिक पंचायत समिती आवारात पं.स. सभापती रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, संर्वग विकास अधिकारी मोहीतकर तसेच पं. स. पंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, पशुसंवर्धन व सामान्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्रमदानातून कार्यालय परिसरात स्वच्छता केली.
(तालुका प्रतिनिधी)