गोंदोडा गुंफा यात्रेने वाढविले एसटीचे उत्पन्न

By Admin | Updated: March 26, 2016 00:44 IST2016-03-26T00:44:00+5:302016-03-26T00:44:00+5:30

राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदोडा (गुंफा) यात्रेसाठी चिमूर एसटी आगाराने विशेष बसची व्यवस्था केली होती.

Gondola cave boosts the growth of ST | गोंदोडा गुंफा यात्रेने वाढविले एसटीचे उत्पन्न

गोंदोडा गुंफा यात्रेने वाढविले एसटीचे उत्पन्न

चार हजारावर यात्रेकरूनी केला प्रवास : ९४ फेऱ्यातून ५८ हजारांचा नफा
चिमूर : राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदोडा (गुंफा) यात्रेसाठी चिमूर एसटी आगाराने विशेष बसची व्यवस्था केली होती. चार दिवस चालणाऱ्या यात्रेत तीन हजार ८२७ यात्रेकरु प्रवाशांनी प्रवास करून राष्ट्रसंताचे दर्शन घेतले. यात चिमूर एसटी आगाराला ५८ हजार सहाशे चोवीस रुपयांचे उत्पन्न मिळाले.
चिमूर एसटी आगाराने या यात्रेसाठी दहा बसेसी व्यवस्था केली होती. या दरम्यान चिमूर-गोंदोडा, सिंदेवाही-गोंदोडा, खांबाडा व केवाडा पेठ मार्गे एसटीच्या एकूण ९४ फेऱ्या केल्या असून यात्रेनिमित्त तीन हजार ८२७ यात्रेकरूंनी एसटीने प्रवास केला. एसटीच्या चार दिवसीय फेऱ्यात चिमूर एसटी आगाराने एकूण ५८ हजार ६२४ रुपयाचे उत्पन्न घेतले.
यात्रेनिमित्त विशेष बसफेऱ्यासाठी आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम, पेंडके, सिडाम, कांबळे, मोती खांदे, तिवारी, वाघमारे, पांडुरंग अडसोडे, रमेश नान्ने, नवलकर, सुधीर भिलकर, मुंडे, भदभूसे, बारापात्रे, धुमाळे, माणे, चोपडे, हजारे, के. चौधरी, एस. नन्नावरे, डी. गिरी, किन्द्रे, आदींनी मोलाचे सहकार्य केले. (लोकमत चमू)

Web Title: Gondola cave boosts the growth of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.