गोंडपिपरी नगरपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 00:41 IST2016-08-11T00:41:05+5:302016-08-11T00:41:05+5:30

गोंडपिपरी नगरपंचायतीला शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला.

Gondipipri Nagapanchayat visit to the District Collector | गोंडपिपरी नगरपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

गोंडपिपरी नगरपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नियोजनाबाबत आढावा : तालुक्यातील गावांची पाहणी
गोंडपिपरी : गोंडपिपरी नगरपंचायतीला शहराच्या विकासासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला. या निधीचा योग्य विनीयोग व्हावा, अशा सुचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी बुधवारी नगरपंचायत कार्यालयात अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी नगरपंचायतीला भेट देऊन सभा घेतली. पहिल्यांदाच नगरपंचायत गोंडपिपरी येथे तासभर चाललेल्या बैठकीत शहरातील विविध विषयावर चर्चा झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडपिपरी शहराच्या विकासाकरिता दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आणि निधी मंजुरही झाला. या निधीचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली.
विकासाच्या नियोजनासंदर्भात जिल्हाकिारी आशुतोष सलील यांनी पाणी पुरवठा गांभीर्याने घेत नांदगाव जलशुद्धीकरण केंद्र, सुरगावपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्याचे आदेश दिलेत. यावेळी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार शिवराज पडोळे, आ. संजय धोटे, नगराध्यक्ष संजय झाडे, उपाध्यक्ष चेतनसिंह गौर, व नगरपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या ओपनस्पेस संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.
शौचालय निर्मिती सोबतच अनेक विषय घेत १० कोटी रुपयांचा उपयोग शहराच्या विकासासाठी कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करावे, अशा सुचना नगरपंचायत प्रसासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gondipipri Nagapanchayat visit to the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.