जी.एन.आर. कंपनीतील तोडफोडप्रकरणी पु्न्हा आठ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:51+5:302021-02-20T05:23:51+5:30

या प्रकरणी यापूर्वी सात आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री दुर्गापूर पोलिसांनी आठ आरोपींना ...

G.N.R. Eight accused arrested again in company vandalism case | जी.एन.आर. कंपनीतील तोडफोडप्रकरणी पु्न्हा आठ आरोपींना अटक

जी.एन.आर. कंपनीतील तोडफोडप्रकरणी पु्न्हा आठ आरोपींना अटक

या प्रकरणी यापूर्वी सात आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री दुर्गापूर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. यात प्रकाश कांबळे (२४), राम तुफान यादव (३३ )रा.चंद्रपूर, बाळा चंदनवार, दिनेश महाकुलकर (३०) ,मुकेश बावणे (३३) तुकुम, प्रशांत खामत (३८) पद्मापूर, रफिक सय्यद (३१) रा. दुर्गापूर, नामदेव सूमटकर (४७) रा. तिरवंजा यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक झाली आहे.

सात आरोपींना सुनावण्यात आलेली एक दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा त्यांना अटक झालेल्या आठ आरोपींसह न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद या प्रकरणावर विशेष लक्ष ठेवून आहेत.

Web Title: G.N.R. Eight accused arrested again in company vandalism case