जि.म.स. बँकतर्फे आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:27+5:302021-02-05T07:43:27+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बँकेतील कर्मचाऱ्यांना तसेच शेतकरी कल्याण निधीअंतर्गत शेतकरी बांधवांना धनादेशाचे वितरण पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार ...

जि.म.स. बँकतर्फे आर्थिक मदत
चंद्रपूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बँकेतील कर्मचाऱ्यांना तसेच शेतकरी कल्याण निधीअंतर्गत शेतकरी बांधवांना धनादेशाचे वितरण पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह चंदेल, उपाध्यक्ष यशवंत दिघोरे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सुभाष नाखले, ब्रह्मपुरी शाखेतील उदय पाडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. शेतकरी कल्याण निधीअंतर्गत मूल तालुक्यातील बेंबाळ येथील रवींद्र तिमाडे यांच्या अपघाताच्या उपचाराकरिता २५ हजार रुपये, शंकर वैद्य यांच्यावर वीज पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना १० हजार, हरिश्चंद्र डांगे यांचा वीज पडून गोठा जळाल्यामुळे १० हजार रुपये, तर पंढरीनाथ नांदेकर यांना ब्रेन हॅमरेजच्या उपचाराकरिता ४० हजार रुपयाचा डीडी देण्यात आला. तर सॅलरी पॅकेजअंतर्गत सुनील पोपटे यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला १६ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.