जीएम स्पेशल रेल्वे येण्याची तारीख पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:47+5:302021-01-08T05:35:47+5:30

फोटो बल्लारपूर : मागच्या एक महिन्यापासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विविध विभागांचे निरीक्षण व चर्चा करण्यासाठी ८ जानेवारीला मुंबई ...

GM postpones arrival date of special trains | जीएम स्पेशल रेल्वे येण्याची तारीख पुढे ढकलली

जीएम स्पेशल रेल्वे येण्याची तारीख पुढे ढकलली

फोटो

बल्लारपूर : मागच्या एक महिन्यापासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विविध विभागांचे निरीक्षण व चर्चा करण्यासाठी ८ जानेवारीला मुंबई येथून येणारी जीएम स्पेशल गाड़ी काही कारणास्तव अडचणीत आली असून पुढील दौऱ्याची तारीख कधी राहील, याकडे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील एक महिन्यापासून जीएम स्पेशल दौऱ्यासाठी मध्य रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी बल्लारशाह ते सेवाग्रामपर्यंत स्थानकांना भेटी देऊन अडीअडचणी दूर करीत होते. बल्लारशाह स्थानकावर सजावटीकडे मात्र त्यांचा विशेष कल होता. स्थानक चकचकीत होत होते, कलर पेंटिंग सुरू होती. परंतु अचानक स्थानकाच्या निरीक्षणाची तारीख पुढे गेल्यामुळे अधिकाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

फोटो : लोको पायलट व परिचालक लॉबीजवळ बनविलेले मनमोहक किल्ल्यांनी वेढलेल्या शहराचे दृश्य.

Web Title: GM postpones arrival date of special trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.