‘त्या’ अभियानाला गाडगेबाबांचे नाव द्या

By Admin | Updated: June 18, 2015 01:06 IST2015-06-18T01:06:36+5:302015-06-18T01:06:36+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला श्री संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी धोबी समाज बांधवांनी केली आहे.

Give the name 'Gadgebaba' to that campaign | ‘त्या’ अभियानाला गाडगेबाबांचे नाव द्या

‘त्या’ अभियानाला गाडगेबाबांचे नाव द्या

चंद्रपूर: स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला श्री संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याची मागणी धोबी समाज बांधवांनी केली आहे.
गेल्या १५ वर्षापासून महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्र राज्यात सुरु केलेला आहे. या अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. या अभियानामुळे संत गाडगेबाबा यांची सामाजिक प्रबोधन विचारधारा जनमाणसापर्यंत पोहोचली आहे. श्री संत गाडगेबाबांनी किर्तनाच्या माध्यमातून अनिष्ठ परंपरा आणि रुढी यांचे समाजातून उच्चाटन व्हावे यासाठी प्रबोधनदेखील केलेले आहे. गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यामतून फक्त प्रबोधनच केले नाही तर गावागावात जाऊन हातात झाडू घेऊन गावातील रस्ते, सार्वजनिक जागा व मैदाने स्वच्छ केली. स्वच्छतेचे महत्व बाबांनी देशाला, महाराष्ट्राला आणि समाजाला प्रथम समजावून सांगितले आहे. बांबाच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि श्री संत गाडगेबाबांच्या नावाने महाराष्ट्रात श्री संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्पर्धा अभियान सुरु केले आहे.
परंतु आता केद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याचे ठरविले आहे.राज्यामध्ये श्री संत गाडगेबाबा यांच्या नावाने श्री संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु आहे. श्री संत गाडगेबाबांच्या कार्याचा गौरव म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियानालासुद्धा श्री संत गाडगेबाबांचे नाव देऊन या अभियानाचे नाव श्री संत गाडगेबाबा स्वच्छ महाराष्ट्र अभियान असे करण्यात याव,े अशी मागणी धोबी समाज बांधव प्रमोद केळझरकर, नामदेव लोणारवार, बाबुराव गुंडावार, तुळशिराम बारसागडे, सुरेश खुरसाने, देवराव भोंगळे, नथ्यू वाघमारे, वामन क्षीरसागर, धनराज येलमुलवार, लोभेश पिल्लेवार आदीनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give the name 'Gadgebaba' to that campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.