चांदा क्लब ग्राऊंडला अब्दुल कलाम यांचे नाव द्या
By Admin | Updated: August 1, 2015 01:05 IST2015-08-01T01:05:15+5:302015-08-01T01:05:15+5:30
देशातील कोट्यवधी तरुणाचे प्रेरणास्थथान असलेल्या, धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक असलेल्या, विज्ञान नावाच्या धर्माची शिकवण देणाऱ्या मिसाईल मॅन ...

चांदा क्लब ग्राऊंडला अब्दुल कलाम यांचे नाव द्या
चंद्रपूर: देशातील कोट्यवधी तरुणाचे प्रेरणास्थथान असलेल्या, धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतिक असलेल्या, विज्ञान नावाच्या धर्माची शिकवण देणाऱ्या मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव चांदा क्लब ग्राऊंडला देण्यात यावे, अशी मागणी मनोवेध संस्थेने केली आहे.
कलाम यांच्यासारख्या अलौकीक व्यक्तीमत्वाचे विचार ऐकण्याचे, त्यांच्याशी संवाद साधण्याचे भाग्य चंद्रपूरकराना मिळाले. १४ फेब्रुवारी २०१४ ला मनोवेध सांस्कृतीक प्रतिष्ठान व खा. हंसराज अहीर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक चांदा क्लब ग्राऊंडवर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. हा दिवस खरोखरच अलौकिक प्रेरणा देणारा ठराला. चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या संख्येचा कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यातील ८० हजार विद्यार्थीनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांच्या लाभ घेतला. डॉ. कलाम यांच्या स्पर्शानी पावन झालेल्या चांदा क्लब ग्राऊंडला भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम असे नामकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनोवेधचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, अविनाश देव, प्रशांत आर्वे, पंकज चिमरलवार, अनिल पेटकर, किरण कत्रोजवार, मनोज साळवे, प्रशांत मडपूरवार आदींनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आलेले आहे.(शहर प्रतिनिधी)