चार महिन्यांचे मानधन द्या

By Admin | Updated: July 6, 2015 00:50 IST2015-07-06T00:50:43+5:302015-07-06T00:50:43+5:30

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन रखडले असून सदर वेतन तत्काळ देण्यात यावे,

Give four months' honor | चार महिन्यांचे मानधन द्या

चार महिन्यांचे मानधन द्या

अमिर्झात मेळावा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
गडचिरोली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन रखडले असून सदर वेतन तत्काळ देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील अमिर्झा येथे पार पडलेल्या मेळाव्यादरम्यान दिला आहे.
मेळाव्याला प्रा. दहीवडे, अर्चना भोयर यांच्यासह परिसरातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. लहान बालकांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे. विविध योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माथी मारून शासन मोकळे होत आहे. मात्र तुटपुंजे मानधन देतानाही शासन हात आखडते घेत आहे. केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठीच सरकारची तिजोरी खाली होत आहे काय? अनावश्यक खर्चासाठी कुठून कोट्यवधी रूपये येतात, असा प्रश्न उपस्थित केला. अंगणवाडी महिलांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण दुर्गम भागातील अंगणवाडी महिलांना देणे शक्य आहे काय, याचा विचार शासनाने करावा, मागील चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी आर्थिक अडचणीत आल्या आहेत. मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मेळावा यशस्वीतेसाठी शालू बुरेवार, वनिता उईके, शकुंतला आंबोरकर, रिता दहेलकर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Give four months' honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.