पाच हजार द्या, घरकुल घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:12 AM2021-01-24T04:12:54+5:302021-01-24T04:12:54+5:30

चिमूर : मानवाच्या आयुष्यात एक सुंदर घर असावे, असे एक स्वप्न असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे हे ...

Give five thousand, take home ..! | पाच हजार द्या, घरकुल घ्या..!

पाच हजार द्या, घरकुल घ्या..!

googlenewsNext

चिमूर : मानवाच्या आयुष्यात एक सुंदर घर असावे, असे एक स्वप्न असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्ण राहते. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली. मात्र गरीब, अशिक्षित लाभार्थ्यांना हेरून काही दलाल त्या गरीब लाभार्थ्यांकडून ‘पाच हजार द्या, घरकुल घ्या’ असा नवा फंडा वापरून फसगत करीत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

चिमूर पंचायत समितीअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘ब’ यादीतील लाभार्थ्यांचे घरकुल पूर्णत्वास येत आहे. लवकरच या योजनेतील ‘ड’ यादीतील घरकुल लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करून बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीस्तरावरून सांगण्यात येत आहे.

पंचायत समितीमधून याच ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांचे नाव पाहून काही महाभाग दलाल संबंधित लाभार्थ्यांना हेरून तुमचे घरकुल मंजूर झाले आहे. चेक काढून देतो, पाच हजार द्या असे आमिष दाखवून गरीब लाभार्थ्याची लूट करीत असल्याचा प्रकार मासळ परिसरात चिमूर पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक यांनी उघडकीस आणला आहे.

मात्र या प्रकाराची संबंधित लाभार्थ्याने तक्रार केली नाही. त्यामुळे या प्रकरणाची पंचायत समिती स्तरावरून चौकशी करावी व लाभार्थ्यांची होणारी फसवणूक थांबविण्याची मागणी लाभार्थी करीत आहेत.

कोट

मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘ड’ यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांकडून एका व्यक्तीने तुझे घरकुल मंजूर झाले. चेक काढून देतो असे सांगून पाच हजार रुपये नेल्याची तोंडी तक्रार केली. चेक काढायला पैसे लागत नाही. ‘ब’ यादी संपल्यानंतर लगेच ‘ड’ यादीतील सगळ्यांचेच घरकुल टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे यापुढे कुणीही पैसे देऊ नये.

-

रोशन ढोक, उपसभापती पं.स. चिमूर.

Web Title: Give five thousand, take home ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.