मेडिकल कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:29+5:302021-07-20T04:20:29+5:30
चंद्रपूर : ओबीसी समाजाला मेडिकल, युजी व पीजी प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण दिले जात नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे राज्य ...

मेडिकल कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्या
चंद्रपूर : ओबीसी समाजाला मेडिकल, युजी व पीजी प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण दिले जात नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मेडिकल तथा युजी व पीजी प्रवेशाकरिता २७ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय मागास आयोगाने केंद्र शासनाकडे केली आहे. या मागणीची पूर्तता केल्यास २७ टक्के आरक्षण लागू होईल, याचा फायदा ओबीसी विद्यार्थ्यांना होईल, अशी माहिती ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी दिली.
यापूर्वी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी राज्य मागास आयोगाकडे तक्रार केली होती. राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशभरातील इतर ओबीसी संघटनांद्वारे केंद्र सरकारकडे निवेदन दिले होते.
ओबीसींची जातनिहाय जनगणना न करता, केंद्र सरकार शिक्षण क्षेत्रात ओबीसींबाबत अन्यायकारक निर्णय घेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याबाबत केंद्र सरकारला पत्र, निवेदन, आंदोलन व बैठकांच्या माध्यमातून अवगत करूनही ओबीसींवरील अन्याय सुरूच आहे. राज्य मागास आयोगाने तक्रारीची दखल घेऊन केंद्र सरकारकडे मागणी केल्याने ओबीसींच्या जागा २७ टक्के पूर्ववत होण्याची आशा असल्याचे मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.