सीआरएफमधून २५ कोटी द्या

By Admin | Updated: October 25, 2016 00:41 IST2016-10-25T00:41:07+5:302016-10-25T00:41:07+5:30

भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी तसेच गवराळा प्रभागातील चिरादेवीकडे जाणाऱ्या...

Give 25 Crore from CRF | सीआरएफमधून २५ कोटी द्या

सीआरएफमधून २५ कोटी द्या

भद्रावतीत विकास कामे : नितीन गडकरी यांना साकडे
भद्रावती : भद्रावती शहरातील मुख्य रस्त्याच्या कामासाठी तसेच गवराळा प्रभागातील चिरादेवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या विकासात्मक कामासाठी केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाज मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेअंतर्गत २५ कोटी रुपये देण्याची मागणी माजी नगरसेवक नाना दुर्गे यांनी केली आहे.
भद्रावती शहरामध्ये पवित्र नाग मंदिर, जैन मंदिर, बुद्ध लेणी, गणेश मंदिर, भवानी माता मंदिर तसेच रेल्वे स्टेशन असून अशा विविध समाजाच्या भावनाशी जुळून असलेले पर्यटन व तीर्थस्थळ आहे. भद्रावती शहराला एकमेव मुख्य रस्ता असून या रस्त्याला खुप खड्डे पडलेले आहेत. या मुख्य रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेचा निधी कमी पडत असल्याने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक नाना दुर्गे यांनी केंद्रीय मंत्री रस्ते परिवहन व जहाज नितीन गडकरी यांचेकडे धाव घेऊन भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या बांधकामासाठी प्रत्यक्ष निवेदन देऊन २५ कोटी रुपये केंद्रीय मार्ग निधी मधून देण्यात यावे. दोन्ही अति महत्त्वाचे रस्ते असून शासन जी.आर. भारत सरकारचे राजपत्र १० जुलै २०१५ नुसार सी.आर.एफ. निधीच्या निकषात बसत असल्याने रस्त्याचे कामे तात्काळ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी केली. ना. गडकरी यांनी भद्रावती शहराच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही कामासाठी तात्काळ २५ कोटी रुपये केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत देण्यात यावे, अशी मागणी दुर्गे यांनी प्रत्यक्ष निवेदन देऊन केली आहे. यावेळी प्रामुख्याने विक्रांत बिसेन, किशोर बेलेकर, सचिन जयस्वाल, दिलीप दुर्गे, श्रीकांत आस्वले, महादेव राऊत, हरी पोहनकर, मंगेश दानव, राजू आडे, दिलीप किन्नाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

अहीर व मुनगंटीवार यांना निवेदन
हायवे रोड पेट्रोलपंप ते रेल्वे स्टेशनपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम करण्यासाठी २० कोटी रुपये लागतात. तसेच गवराळा गावातून चिरादेवीकडे जाणारा टीपार्इंटपर्यंत आणि ४ ते ५ गावांचा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा खर्च नगर परिषद करू शकत नसल्याने या दोन्ही रस्त्याचे काम थंडबस्त्यात असून पर्यटन स्थळ असलेल्या गावाचे तीन-तेरा वाजले आहेत. भद्रावती शहरातील अतिमहत्त्वाच्या मुख्य रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांना २८ जून २०१५ ला निवेदन दिले. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ७ मार्च २०१५ ला निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: Give 25 Crore from CRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.