बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

By Admin | Updated: June 10, 2015 01:36 IST2015-06-10T01:36:53+5:302015-06-10T01:36:53+5:30

बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

Girls are leading in Ballarpur taluka | बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

बल्लारपूर तालुक्यात मुली आघाडीवर

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात एकूण १९ शाळेमधून १ हजार ६२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १ हजार ३३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याची टक्केवारी ८२.१८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८४.२२ टक्के इतके आहे. दहावीच्या निकालात यावर्षीही मुलींनी आघाडी घेतली आहे.
येथील दिलासा ग्राम कॉन्व्हेंट, भालेराव पब्लिक स्कूल, साईबाबा ज्ञानपीठ कॉन्व्हेंट व गुरुनानक पब्लिक स्कूल या शाळेनी दहावीच्या निकाल १०० टक्के देऊन उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेला बल्लारपूर तालुक्यात ८४१ मुले व ७८६ मुली असे एकूण १ हजार ६२७ बसले होते. यातील ६७५ मुले व ६६२ मुली उत्तीर्ण झाल्या. जनता विद्यालय बल्लारपूरचा निकाल सर्वात कमी ५३ टक्के लागला. येथील १३२ विद्यार्थ्यांपैकी ७० विद्यार्थ्यांनी यशाची पायरी गाठली.
विसापूर येथील श्री चिंतामणी विद्यालयातील ५० पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९६ टक्के आहे. येथील आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ३८ पैकी ३६ विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले. येथे ९४.७३ टक्के निकाल लागला. नांदगाव (पोडे) येथील स्व. गोपाळराव वानखेडे माध्यमिक विद्यालयात ९५ पैकी ८९ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण टक्केवारी ९३.६८ इतकी आहे. बामणी (दुधोली) येथील श्री बालाजी हायस्कूलचा ९५.२३ टक्के निकाल लागला आहे. गिलबिली येथील यशोधरादेवी आदिवासी आश्रमशाळेचा ८८.८८ टक्के निकाल लागला आहे.
कोठारी येथील जनता विद्यालय कोठारीचा ८८.४२ टक्के निकाल लागला आहे. येथील न्यू इंडिया कॉन्व्हेंटमध्ये २३ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ८६.९५ टक्के निकाल लागला. सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचा ९०.६२ टक्के निकाल लागला आहे. येथील महात्मा ज्योेतिबा फुले विद्यालयाची टक्केवारी ८०.६४ इतकी आहे.
मानोरा येथील शांती निकेतन विद्यालयमध्ये ३४ पैकी २७ विद्यार्थी पास झाले असून निकालाची ७९.४० टक्के आहे.
मोहसिनभाई जव्हेरी कन्या विद्यालयात १७० पैकी १२२ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. येथे ७१.७६ टक्के निकाल लागला. नगर परिषद गांधी विद्यालयात ६२ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथे ६१.२९ टक्के निकाल लागला.
थापर हायस्कूलमध्ये ९५ पैकी ६२ विद्यार्थी पास झाले असून उत्तीर्ण टक्केवारी ६५.२६ इतकी आहे. जनता हायस्कूल डेपो शाखेत १०४ पैकी ६२ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. येथे ५९.६१ टक्के निकाल लागला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Girls are leading in Ballarpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.