हळद लागण्याच्या तीन दिवसांपूर्वी युवतीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST2021-01-08T05:36:18+5:302021-01-08T05:36:18+5:30
वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय सन २०१५ पासून डॉ. नीलिमा सुखचंद नंदेश्वर या सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत ...

हळद लागण्याच्या तीन दिवसांपूर्वी युवतीचा मृत्यू
वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय सन २०१५ पासून डॉ. नीलिमा सुखचंद नंदेश्वर या सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या हटवार ले-आऊट उमरेड येथील रहिवासी होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांचा विवाह नागपूर येथील डॉक्टर अश्विन खेमराज टेंभेकर यांच्याशी जुळला होता. हा विवाह १० जानेवारी रोजी उमरेड येथे निश्चित झाला होता. त्यामुळे वर-वधूकडच्यांनी विवाहाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. नीलिमा नंदेश्वर विवाहाच्या तयारीसाठी रजेवर होत्या. परंतु विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक गुण देण्याकरिता त्या आपल्या आई समवेत एमएच ४० बीएल ०८८७ या क्रमांकाच्या वाहनाने गुरुवारी उमरेडवरून वरोराकडे येत असताना उमरेड-गिरड मार्गावरील पाईकमारी गावानजीक वळणावर वाहन अनियंत्रित झाले व रस्त्याच्या बाजूला पलटले. वाहन स्वतः नीलिमा वाहन चालवीत होत्या. त्या गंभीर जखमी झाल्या. आई जखमी झाल्या. त्यांना हिंगणघाट येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नीलिमाचा मृत्यू झाला.
नियोजित वधूचा अपघातात मृत्यू झाल्याने दोन्ही परिवारात शोककळा पसरली. हळद लागण्याच्या तीन दिवसांपूर्वीच नीलिमाच्या आयुष्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.