चंद्र्रपुरातील विविध गणेश मंडळांना मुनगंटीवारांनी दिल्या भेटी
By Admin | Updated: September 27, 2015 00:46 IST2015-09-27T00:46:07+5:302015-09-27T00:46:07+5:30
राज्याचे वित्त आणि वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शनिवारी चंद्रपूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले.

चंद्र्रपुरातील विविध गणेश मंडळांना मुनगंटीवारांनी दिल्या भेटी
चंद्रपूर : राज्याचे वित्त आणि वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून शनिवारी चंद्रपूर शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन श्रींचे दर्शन घेतले.
या भेटीदरम्यान पर्यावरणाच्या बचावाचा संदेश गणेशभक्तांना देत त्यासाठी जागृतपणे पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव सामाजिक जवाबदारीची जाणीव देणारा, समाजात ऐक्याची भावना निर्माण करणारा उत्सव आहे. या उत्सवाचे पावित्र्य, मांगल्य जपत त्या माध्यमातुन पर्यावरणाचा समतोल साधणे ही आम्हा सर्वांची जवाबदारी असल्याचे आवाहन त्यांनी केले.
या दरम्यान मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जटपुरा वार्डातील चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जुना वरोरा नाका चौकातील युवा राजा गणेश मंडळ, भानापेठ वार्डातील रेणुकामाता गणेश मंडळ, बाबुपेठ येथील नृसिंह आखाडा गणेश मंडळ, विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा गणेश मंडळ, रामनगर येथील सिंधी समाज गणेश मंडळ, भानापेठ वार्डातील न्यू इंडिया गणेश मंडळ आदी गणेश मंडळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवादही साधला. जागृत युवकांनी समाजकार्यासाठी आणि पर्यावरण बचावासाठी पुढे येण्याची अपेक्षा त्यांनी भेटींदरम्यान व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)