घुग्घुसवाशींचा ग्रा. पं. निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:43+5:302020-12-31T04:28:43+5:30
१९९९ मध्ये घुग्घुस नगर परिषद निर्मितीबाबत शासनाने अधिसूचना काढली. मात्र, नगर परिषदेचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे अनेकदा आंदोलने ...

घुग्घुसवाशींचा ग्रा. पं. निवडणुकीवर बहिष्कार
१९९९ मध्ये घुग्घुस नगर परिषद निर्मितीबाबत शासनाने अधिसूचना काढली. मात्र, नगर परिषदेचा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे अनेकदा आंदोलने झाली. घुग्घुस नगर परिषद निर्मिती संघर्ष समितीची स्थापना झाली. संघर्ष समितीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. राज्यात मह आघाडीचे सरकार आल्यानंतर घुग्घुस नगर परिषदेच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यात आले. ३० ऑगस्ट २०२० रोजी दुस-या शासनाने नगर परिषद निर्मितीसाठी अधिसूचना जारी केली. सर्व प्रक्रिया वेगाने सुरू असतानाच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक अधिसूचना जारी झाली. नगर परिषदेच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांनी व सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मुंडन आंदोलन केल्यानंतर आज ठिय्या आंदोलन केले.