शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

घुग्घूस, पोंभूर्णा बसस्थानक कात टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:16 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्घूस येथे आठ कोटी १८ लाख ७० हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे सहा कोटी ४८ लाख २४ हजार १८२ रू. किमतीचे बसस्थानकांचे बांधकाम करण्याच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवासी खूश : पालकमंत्र्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील घुग्घूस आणि पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानकांचे बांधकाम करण्यात येणार असून घुग्घूस येथे आठ कोटी १८ लाख ७० हजार १५० रू. तर पोंभूर्णा येथे सहा कोटी ४८ लाख २४ हजार १८२ रू. किमतीचे बसस्थानकांचे बांधकाम करण्याच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.घुग्घूस येथील बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून पोंभूर्णा येथे नव्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. आमदार नाना श्यामकुळे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घूस येथे अत्याधुनिक बसस्थानकाचे बांधकाम करण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती व त्या माध्यमातून अर्थमंत्र्यांनी ही मागणी पूर्णत्वास आणली आहे.पोंभूर्णा येथील नागरिकांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा येथे अत्याधुनिक बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यांनी जाहीरपणे दिलेला शब्द पूर्णत्वास येत आहे. या दोन्ही बसस्थानकाच्या ठिकाणी इमारत, फर्निचर, पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहनतळ बांधकाम, सोलर पॅनेल लाईटिंग, धूप प्रतिबंधक व्यवस्था, विंधन विहीर व पंप हाऊस बांधकाम आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे.त्या माध्यमातून अत्याधुनिक बसस्थानकाचे जनतेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर, बल्लारपूर, मूल या शहरांमध्ये मंजूर अत्याधुनिक बसस्थानकांची बांधकामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच ते जनतेच्या सेवेत येतील.