येसगावच्या महिलांचा पंचायत समितीवर घागर मोर्चा
By Admin | Updated: January 3, 2017 00:43 IST2017-01-03T00:43:18+5:302017-01-03T00:43:18+5:30
तालुक्यातील येसगाव येथे मागील तीन वर्षा पासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

येसगावच्या महिलांचा पंचायत समितीवर घागर मोर्चा
बीडीओंशी चर्चा : संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
मूल : तालुक्यातील येसगाव येथे मागील तीन वर्षा पासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याचे दृष्टीने येजगाव येथील नागरिकानी ग्रामपंचायतीनकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र पाण्याची समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरल्याने सोमवारी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात संतप्त महिलांनी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला.
महिलांचा मोर्चा पंचायत समितीवर धडकताच संवर्ग विकास अधिकारी पांडरबळे यांनी शिष्टमंडळाला बोलावून पाणी समस्या जाणून घेतली. पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने टंचाईग्रस्त योजने अंर्तगत हातपंपाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसेच १४ वा वित्त आयोग अंर्तगत वाढीव पाईप लाईनचे प्रस्ताव पाणी पुरवठा विभाकडे तांत्रीक मंजुरीसाठी पाठविले असल्याचे सांगत ताबडतोब तांत्रीक मंजुरी मिळण्या संदर्भात पाणी पुरवठा विभागाशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून जानेवारी अखेर पर्यंत वाढीव पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.या मोर्चात महासचिव छाया सिडाम, अनिल मडवी, प्रेमदास उईके, दिनेश घाटे, बाळु मडावी, किरण बावणे , अमित राऊत आदी महिलांचा समावेश होता.