महिलांच्या अर्थनिर्भरतेसाठी घरकुल मार्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:54+5:302021-02-05T07:39:54+5:30
चंद्रपूर : कोरोना काळात लहान-मोठ्या अनेक उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे ...

महिलांच्या अर्थनिर्भरतेसाठी घरकुल मार्ट
चंद्रपूर : कोरोना काळात लहान-मोठ्या अनेक उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वरोरा तालुक्यातील टेमुडा येथील 'घे भरारी' महिला ग्रामसंघाने 'घरकुल मार्ट' केंद्र स्थापन करून घराला लागणारे साहित्य विक्री केंद्र उभारले आहे. हे महाराष्ट्रातील चौथे केंद्र ठरले आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते 'घरकुल मार्ट' चे उद्घाटन पार पडले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने, पंचायत समितीचे सभापती रवींद्र धोपटे, प्रवीण भांडकर, राजू घोटे, सहायक गटविकास अधिकारी वानखेडे, विस्तार अधिकारी चनफने, माधुरी येरमे, ग्रामसंघाच्या अध्यक्ष चंद्रकला चाहनकर, सविता जवले, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भद्रकार, तालुका व्यवस्थापक राजेश बारसगडे आदी उपस्थित होते.
आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंदिरा आवास योजना, शबरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या अनेक योजनेलतील लाभार्थ्यांना घरकामाला लागणारे साहित्य शहरात येऊन खरेदी करावे लागते. त्यामुळे वेळ व पैसे जास्त प्रमाणात लागत असतो. हा नाहक त्रास कमी करण्याकरिता महिला ग्रामसंघ यांनी हे साहित्य विक्रीचे केंद्र उभे केले आहे. यामध्ये गावातच वाजवी दरात साहित्य उपलब्ध होणार आहे. असाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात 'घरकुल मार्ट' केंद्र उभे करून महिलांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. अशा लोकहितकारी कामात माझी सतत मदत राहणार असल्याचे आमदार धानोरकर यांनी सांगितले.