चंद्रपूर : राष्ट्रीय मतदार दिवस हा लोकशाही बळकटीचा पाया असून, मतदार हा लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या उमेदवांरानी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले.
बचत साफल्य सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार, पल्लवी घाटगे (रोहयो), शिक्षणाधिकारी नरड, तहसीलदार निलेश गौंड, विविध विद्यालयांतील विद्यार्थी तसेच शिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते. जिल्हास्तरावर प्रशासनातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोविड महामारी व राष्ट्रीय मतदार दिन या विषयांवर निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रंगोळी स्पर्धा समावेश होता. ज्यांनी उत्कृष्ट, निबंध लेखन, उत्कृष्ट मतदान जागृतीचे वर्णन करणारी चित्रकला तसेच जागतिक व मतदान जागृती संदेश देणारी रांगोळी रेखाटली होती. त्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कार, रोख व प्रशस्तीपत्र स्वरूपात देण्यात आले आहे.
निबंध लेखनासाठी प्रथम पुरस्कार प्राची नितीन उदार, मातोश्री विद्यालय, तुकुम, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार मीनल प्रेमदास चिकनकर, एफईएस गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर, तृतीय पुरस्कार वेदिका राजकुमार अस्वले, मातोश्री विद्यालय, तुकुम, चंद्रपूर यांनी पटकावला आहे. मतदान जागृती संदेश देणारी रंगोळी स्पर्धा प्रथम पुरस्कार प्रांजली प्रमोद मेंदरे, मातोश्री विद्यालय, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार संजीवनी सुभाष गेडेकर, मातोश्री विद्यालय, तुकूम, चंद्रपूर, तृतीय पुरस्कार रूपाली कैलास रामटेके, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, चंद्रपूर व उत्कृष्ट मतदान जागृतीचे वर्णन करणारी चित्रकला सादरीकरणासाठी प्रथम पुरस्कार सेजल योगेश ढोके, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, चंद्रपूर, व्दितीय पुरस्कार मिनल प्रेमदास चिकनकर, एफईएस गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर, तर तृतीय पुरस्कार कल्पश्री यशवंत निकोडे, मातोश्री विद्यालय, चंद्रपूर यांनी पुरस्कार प्राप्त केले. संचालन राजू धांडे, आभार तहसीलदार सतीश साळवे यांनी व्यक्त केले.