जिल्हा प्रशासनाकडून असे मिळवा रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:35+5:302021-04-25T04:28:35+5:30

रेमडेसिविर इंजेक्शन मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. याबद्दलची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त ...

Get it from the district administration | जिल्हा प्रशासनाकडून असे मिळवा रेमडेसिविर

जिल्हा प्रशासनाकडून असे मिळवा रेमडेसिविर

रेमडेसिविर इंजेक्शन मुख्य उत्पादकाकडून, वितरक व स्टॉकिस्टकडे इंजेक्शन प्राप्त होतात. याबद्दलची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना प्राप्त होते. अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात कार्यरत कोविड रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये भरती रुग्णांच्या आधारे रुग्णालयनिहाय समप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाचे वर्गीकरण करून ते जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वर्गीकरण तपासून मान्यता देण्यात येते व मान्यतेप्रमाणे इंजेक्शन संबंधित रुग्णालयांच्या औषध विक्रेत्याकडे वर्ग करण्यास आदेशित करण्यात येते. कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांद्वारे त्यांच्या रुग्णालयात भरती रुग्णांची तपासणी करून ज्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता आ,हे त्यांना क्रमाने इंजेक्शनबाबतचे प्रिस्क्रिप्शन देऊन सदर प्रिस्क्रिप्शन आधारे त्या रुग्णालयाला संलग्न औषध वितरकाकडे इंजेक्शन प्राप्त करून घेण्यासाठी पाठविण्यात येते. औषध वितरकाने ज्याप्रमाणे डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिले आहे त्याच क्रमाने प्रिस्क्रिप्शनधारकास इंजेक्शन देण्यात येते. औषध वितरकाने इंजेक्शन देण्याबाबत व रुग्णांची सविस्तर नोंद परिशिष्टमध्ये करण्यात येणार आहे.

रुग्णांच्या कुटुंबाशी साधणार संपर्क

औषधी वितरकाने शासनाने निर्धारित करून दिलेले दर आकारावे. औषधी वितरकाने रुग्णांचा तपशील दररोज सायंकाळी ८.३० वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाला सादर करावा. प्राप्त यादीतील तपशिलाची तपासणी व पडताळणी नियंत्रण कक्षाद्वारे केली जाईल. यासाठी ठराविक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून खात्री करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष ०७१७२-२७४१६१, २७४१६२ संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

Web Title: Get it from the district administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.