चंद्रपूर : कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थ्यांनी परिपूर्ण प्रशिक्षणातून आपले कौशल्य विकसित करून घ्यावे व त्यातून रोजगार किंवा स्वयंरोजगार प्राप्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबलावणीकरिता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ३.० चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते नुकतेच प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन करण्यात आले.
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता र्मागदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांनी उमेदवारांना चालून आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या संधीचा लाभ घ्यावा व जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे संचालक अनुराग सिंग यांनी संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थ्यांना सीसी टीव्ही इन्टॉलेशन, कम्प्युटिंग ॲण्ड पेरीफेरल टेक्निशियन या जॉब रोलमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली.