राजपत्रित अधिकारी महासंघाचे आंदोलन

By Admin | Updated: August 12, 2015 00:51 IST2015-08-12T00:51:30+5:302015-08-12T00:51:30+5:30

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूर व संलग्न कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ..

Gazetted Officers Federation Movement | राजपत्रित अधिकारी महासंघाचे आंदोलन

राजपत्रित अधिकारी महासंघाचे आंदोलन

निवेदन सादर : विविध मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा चंद्रपूर व संलग्न कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले.
राजपत्रित अधिकारी महासंघ जिल्हा शाखा अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, सरचिटणीस डॉ. अविनाश सोमनाथे, उपाध्यक्ष आर.एम.पवार, दूगार्वाहिनी अध्यक्षा डॉ.सुचिता धांडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, कोषाध्यक्ष एम.एस.वाघमारे, कार्यकारणी सदस्य नितीन जुनोनकर, डी.एस.राऊतकर, महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पिंपळशेडे, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर व राजपत्रित अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्राप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे व भारतीय प्रशासनिक सेवाप्रमाणे ६० वर्ष करणे, १ जानेवारी २०१५ पासून केंद्राप्रमाणे ६ टक्के महागाई भत्ता वाढ, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील रुपये ५४०० च्या ग्रेडपेची मर्यादा काढणे, महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा, प्रशंसनीय कामाबद्दल १ जानेवारी २००६ पासून आगाऊ वेतनवाढ, मानिव निलंबन कार्यपध्दती बंद करण्यात यावी, अन्याय दूर करण्यासाठी उपलब्ध असलेली मॅट यंत्रण रद्द करु नये, सर्व रिक्त पदे भरण्याची आवश्यकता, केंद्राप्रमाणे वाहतुक, संघटनांना आवश्यक शासन सुविधा द्याव्यात, अधिकाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नेमणूक, कल्याण केंद्रासाठी मंजूर झालेला १० कोटीचा निधी लवकर द्यावे, चौकशी शिवाय अधिकारी, कर्मचाऱ्याचे निलंबन होऊ नये व चक्राकार पध्दतीने पदोन्नतीने बदल्यासंदर्भात सुधारणा करण्यात यावी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gazetted Officers Federation Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.