गौरीशंकर पाराशर यांचा चंद्रपुरात सत्कार

By Admin | Updated: July 26, 2015 01:33 IST2015-07-26T01:33:28+5:302015-07-26T01:33:28+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु आणि विद्यापीठ क्षेत्रात एक मोठे नाव असलेले

Gaurishankar Parashar honored at Chandrapur | गौरीशंकर पाराशर यांचा चंद्रपुरात सत्कार

गौरीशंकर पाराशर यांचा चंद्रपुरात सत्कार


चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु आणि विद्यापीठ क्षेत्रात एक मोठे नाव असलेले व्यक्तिमत्त्व डॉ.गौरीशंकर पाराशर यांची इंडियन मेरीटाइम विद्यापीठ चेन्नई या केंद्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली. यानिमित्ताने येथील जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्रीलीला सभागृहात प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे यांच्या हस्ते त्यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ.प्रतिभा अशोकराव जीवतोडे तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य समीर केणे, स्वप्नील दोंतुलवार, गोंडवाना विद्यापीठ शिक्षण शाखेचे अधिष्ठाता डॉ.राजेश चंदनपाट, आनंद नागरी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक जीवतोडे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.पाराशर म्हणाले, नॉटीकल सायन्स आणि मरीन इंजिनिअरिंगमध्ये एक्स्ट्रा पदव्युत्तर आणि एक्स्ट्रा इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करणारे हे जगातील एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठातील मरिन इंजिनिअरिंग व एक्वॉकल्चर अभ्यासक्रमामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना जगभरात नोकरी आणि रोजगार क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहे.
माझ्या जीवनात सुरुवात आणि पायाभरणी जनता शिक्षण महाविद्यालयातून झाली आणि आजही मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो. श्रद्धेय स्व. जीवतोडे गुरुजींच्या आशिर्वादाने मी या ठिकाणी पोहचलो आहे, मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
प्रास्ताविक डॉ.अशोक जीवतोडे यांनी केले. चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरतर्फे डॉ.गौरीशंकर पाराशर यांचा डॉ.अशोक जीवतोडे, डॉ.प्रतिभा अशोक जीवतोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.सुभाष, उपप्राचार्य डॉ.सोमाणी, प्रा.धानोरकर, प्रा.राजुरकर, संस्थेच्या चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालय, शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कनिष्ठ महाविद्यालय, एमसीव्हीसीचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा.डॉ.बरडे तर आभार प्रा.डॉ.पत्तीवार यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Gaurishankar Parashar honored at Chandrapur