नांदगाव (पोडे) येथे गांधीगिरीचे प्रदर्शन

By Admin | Updated: February 6, 2016 01:05 IST2016-02-06T01:05:24+5:302016-02-06T01:05:24+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे.

Gandhigiri's performance at Nandgaon (Pode) | नांदगाव (पोडे) येथे गांधीगिरीचे प्रदर्शन

नांदगाव (पोडे) येथे गांधीगिरीचे प्रदर्शन

उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाबपुष्प : गुडमार्निंग पथकाची कामगिरी
बल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृध्दीकडे जाण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने नागरिकांना उघड्यावर शौचास जाताना संकोच वाटावा. त्यांना स्वच्छतागृहाची सवय लागावी. त्यांचे आरोग्यमान उंचावण्यास मदत व्हावी. याची जनजागृती केली जात आहे. यासाठी गुडमार्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाच्या माध्यमातून बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावात मंगळवारी भल्या पहाटे गांधीगिरीचे अनोखे प्रदर्शन करण्यात आले. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना गुलाबपुष्प प्रदान करून सन्मान करण्यात आला.
बल्लारपूर तालुका संपूर्ण हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करीत आहे. स्वच्छतेचा बल्लारपूर पॅटर्न साकारण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर नियोजित कार्यक्रमानुसार गावागावांत गुडमार्निंग पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. स्वच्छतेची सवय लागण्यास हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल घडत आहे. गावागावांत स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण होत आहे. स्वच्छता आरोग्याशी निगडीत असल्याचे महत्व लोकांना पटत आहे. तरीही काही लोक शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जातात. परिणामी गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी व माजी सरपंच गोविंदा पोडे यांनी सांगीतले.
नांदगाव (पोडे) गाव संपूर्ण हागणदारीमुक्त करण्यासाठी व उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या मनात संकोच निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील परिसर व सावित्रीबाई फुले आयटीआय परिसरात गुडमार्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचा गुलाबपुष्प प्रदान करून सन्मान केला. त्याच बरोबर त्यांच्याजवळील टमरेल जप्त करण्यात आले. ६० च्या आसपास नागरिकांचे गांधीगिरीने स्वागत करण्यात आले. या पथकात सरपंच प्रमोद देठे, उपसरपंच मल्लेश कोडारी, पं.स. उपसभापती अनेकश्वर मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मुके, ग्रामपंचायत सदस्य रेखा मिटपल्लीवार, विनीता कोरवते, अनिता हस्ते, रोशन हस्ते, सुनिल शेंडे, प्रवीण खंडारे, राजू धारणे, मिनाक्षी उराडे, सुवणा४ जोशी, अंकुश उराडे, ग्रामविकास अधिकारी राकेश मांढरे यांचा समावेश होता. गुडमार्निंग पथकाची गावकऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gandhigiri's performance at Nandgaon (Pode)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.