गडचांदूर नगरपालिकेने महामार्गावरील अतिक्रमण हटविले
By Admin | Updated: August 8, 2015 01:10 IST2015-08-08T01:10:29+5:302015-08-08T01:10:29+5:30
गडचांदूर नगर परिषदेने गुरूवारी राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलीस बंदोबस्तात सुरूवात केली.

गडचांदूर नगरपालिकेने महामार्गावरील अतिक्रमण हटविले
गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेने गुरूवारी राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलीस बंदोबस्तात सुरूवात केली.
पेट्रोल पंप चौकापासून ते बस स्थानक पर्यंतचे अतिक्रमण पालिकेने जेसीबी मशिनच्या साहाय्याने काढले. यावेळी दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने शेड काढले. काही ठिकाणी केलेले पक्के बांधकामही पथकाकडून पाडण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी रवींद्र ढाके, अभियंता जोगी, सहायक पोलीस निरीक्षक नितीन उईके तथा पालिकेचे कर्मचारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
महामार्गावरील अतिक्रमण काढणे गरजेचे होते. अतिक्रमण काढून महामार्गाची हद्द निश्चित करावी, अशी नागरिकांची मागणी असून दोन्ही बाजूनी पक्क्या नाल्या बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण होणार नाही. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले. (वार्ताहर)