शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

‘गड’ आणि ‘सिंह’ही आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:18 AM

भद्रावती नगर पालिका निवडणूक निकालाची बेरीज-वजाबाकी करणाºया राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आणि विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत शिवसेनेने १६ जागांवर दणदणीत विजय संपादन करून सलग पाचव्यांदा भद्रावती नगर पालिकेवर........

ठळक मुद्देशिवसेनेचा पंच : अनिल धानोरकर सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती नगर पालिका निवडणूक निकालाची बेरीज-वजाबाकी करणाºया राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत आणि विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरत शिवसेनेने १६ जागांवर दणदणीत विजय संपादन करून सलग पाचव्यांदा भद्रावती नगर पालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहेत. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी भाजपचे सुनील नामोजवार यांच्यावर ३६१६ मताधिक्याने मात करीत विजय संपादन केला. या निवडणुकीत शिवसेनेचा गड आणि सिंहही आला हे विशेष.१३ प्रभागांसाठी पार पडलेल्या सार्वजनिक निवडणुकीत २७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळ वित शिवसेनेने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत शिवसेनेचा ‘गड’ही आला आणि ‘सिंह’ही आला. या विजयानंतर शिवसैनिकांनी विजयी जल्लोष साजरा केला. मतमोजणीच्या सुरुवातीपासून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायमच होती.या निवडणुकीत सर्वच विरोधी पक्षाची ताकत फिकी पडली. शिवसेनेला स्पष्ट बहुमत, राष्टÑवादी कॉंग्रेस भुईसपाट, बसपा, बीआरएसपीचा सफाया, भाकपाला भोपळा, भाजपा भोपळ्यातून बाहेर, कॉंग्रेसला चपराक, भारिप बहुजन महासंघाची मुसंडी, एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय ही निवडणुकीची वैशिष्ट्ये ठरली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिल धानोरकर यांना ११ हजार ६८३ मते तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुनील नामोजवार यांना ८ हजार ६८ मते प्राप्त झाली. अनिल धानोरकर यांचा ३ हजार ६१६ मतांनी विजय झाला. तिसºया क्रमांकावर आलेले बीआरएसपीचे अ‍ॅड. भुपेंद्र रायपुरे यांना ४ हजार ७०२ मते पडले. भरिप बहुजन महासंघाचे कुशल मेश्राम यांना २ हजार ३९८ मते पडली.अपक्ष उमेदवार प्रशांत कारेकर यांना २ हजार ३२२ मते, कॉंग्रेस- राष्टÑवादी कॉग्रेसचे लक्ष्मण बोढाले यांना दोन हजार २३६ मते, बसपाचे विशाल बोरकर यांना केवळ ९६५ तर अपक्ष उमेदवार संजय आसेकर यांना २८७ मतांवर समाधान मानावे लागले. १९२ मतदारांना नोटाला पसंती दिली. ३२ हजार ८५२ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकारी बजावला.सकाळी १० वाजतापासून भद्रावती येतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणीला सुरूवात झाली. अतिशय शांततेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद भुसारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोडे, गिरीश बन्नोरे यांनी काम पाहिले. विभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, ठाणेदार बी. मडावी यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवसेनेतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौक येथे समारोपीय भाषणे झाली. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित झाले होते.या निडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तसेच माजी पालकमंंत्री संजय देवतळे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अतिशय गांभिर्याने ही निवडणूक त्यांचेकडून लढविल्या गेली होती. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. शिवसेनेचा हा विजय आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती तयार करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक