शेतकऱ्याने केला कापसावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:21 IST2018-04-13T23:21:20+5:302018-04-13T23:21:20+5:30
तालुक्यातील सोनुर्ली गावात शेतकºयाने चक्क कापसाची अंत्ययात्रा काढून कापसाला स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केला. शासनाकडून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने चार क्विंटल कापूस स्मशानभूमीत नेऊन पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.

शेतकऱ्याने केला कापसावर अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील सोनुर्ली गावात शेतकºयाने चक्क कापसाची अंत्ययात्रा काढून कापसाला स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केला. शासनाकडून कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने चार क्विंटल कापूस स्मशानभूमीत नेऊन पेटवून दिला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
ईश्वर पडवेकर असे शेतकऱ्याचे नाव असून कापसाला हमीभाव न मिळाल्याने शासन व जिनिंग मालकाच्या कारभाराला कंटाळून ईश्वर पडवेकर यांनी स्वत:च्या कापसावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला. असा प्रकार करून या शेतकऱ्याने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली असून शासनाविरुद्ध शेतकऱ्यांच्या मनात असलेला रोष या माध्यमातून आणखी दिसून आला आहे. ही घटना कोरपना पोलिसांना माहित होताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची अतिशय दैनावस्था झाली आहे. फसवी कर्जमाफी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर बोंड अळी व नापिकीमुळे शेतकरी कंटाळला असताना शेतकºयांच्या पिकाला भाव नाही. कापसाचे पीक सरासरीपेक्षा निम्म्यावर आले आहे. ईश्वर पडवेकर या शेतकºयाने स्मशानभूमीत कापसाची अंत्ययात्रा काढून देशातील शेतकºयांचा प्रातिनिधिक रोष व्यक्त केला आहे.
- अरुण निमजे, माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद, चंद्रपूर.