कोरोनाबाधितेच्या मृतदेहावर मनपाकडून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:19+5:30

महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.

Funeral on the body of Corona | कोरोनाबाधितेच्या मृतदेहावर मनपाकडून अंत्यसंस्कार

कोरोनाबाधितेच्या मृतदेहावर मनपाकडून अंत्यसंस्कार

ठळक मुद्देनातेवाईकांनी फिरविली पाठ : तेलंगणातून आलेल्या महिलेचा कोरोनाने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातून २१ जुलै रोजी एक महिला चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. पॉझिटिव्ह स्वॅब आलेल्या या महिलेचा शर्थीच्या वैद्यकीय उपचारानंतर शुक्रवारी पहाटे २.३० वाजता मृत्यू झाला. मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतक महिलेचे कोणतेही नातेवाईक आले नाही. त्यामुळे अखेर कोरोनाबाधितेच्या मृतदेहांवर महानगरपालिकेकडून अत्यंस्कार करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी घेतला. आणि मनपा कर्मचाऱ्यांनी महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.
महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी अंत्यसंस्काराची तयारी मनपाला करावी लागणार, याची पूर्वकल्पना अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळीच दिली होती. अंत्यसंस्काराची रंगीत तालीम यापूर्वी मनपाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार तयारी सुरु करण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाईक समोर न आल्याने शेवटी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. यावेळी स्वत: आयुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सचिन पाटील व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाचे जगभरात थैमान सुरु असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध करण्यास कसोशीने प्रयत्न सुरु केले. रुग्ण तत्काळ सापडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा याचे नियोजन करण्यात आले. सदर महिला ही तेलंगणा राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. २१ जुलै रोजी दाखल केलेल्या या महिलेला श्वसनाचा त्रास होता. तसेच ही महिला उच्च रक्तदाबाचीदेखील रुग्ण होती. २३ जुलै रोजी ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. रात्रीच या महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांनी पुढे येणे गरजेचे होते. मात्र सर्व नातेवाईकांनी पाठ फिरविली. अखेर मनपा कर्मचाºयांनीच तिच्या पार्थिवावर पठाणपुरा गेटबाहेर तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केला.

प्रारंभी नागरिकांचा विरोध
मृतक महिलेच्या पार्थिवावर पठाणपुरा गेटबाहेरील नव्याने तयार केलेल्या स्मशानभूमीत मनपाद्वारे अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती त्या परिसरात नागरिकांना झाली. त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेत जाऊन मृतक महिलेवर या ठिकाणी अंत्यसंस्कार करू नये, अशी मागणी केली. मात्र मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी नागरिकांची समजूत काढत, अंत्यसंस्काराने कोणालाही कुठलीही बाधा होणार नाही, हे समजावून सांगितले. त्यानंतर नागरिकांचे समाधान झाले.

Web Title: Funeral on the body of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.