चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:45+5:30

चंद्रपूर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. या महाविद्यालयाचे काम दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Fund of Rs 175 crore should be provided for the employment plan of Chandrapur, Gadchiroli and Gondia districts. | चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा

चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १८ जून २०१९ रोजी विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन नक्षलप्रभावित जिल्हयांमध्ये तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी तीन वर्षात ५०० कोटींचा आराखडा तयार करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी १७५ कोटी रू. निधी या तीन जिल्ह्यासाठी आवंटीत करण्याची घोषणासुध्दा करण्यात आली होती. सदर योजना पुढे नेत या वर्षी यासाठी १७५ कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर हे तीन जिल्हे देशातल्या ९० नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी आहे. हे तिनही जिल्हे वनक्षेत्र बहुल, आदिवासीबहुल व मागास आहे. या जिल्हयांमधील जवळपास सर्वच तालुक्यांचा समावेश मानव विकास निर्देशांकामध्ये आहे. या तीन जिल्हयांसाठी सुक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग यांना चालना देत तरूणांच्या हाताला काम मिळावे व नक्षलवाद संपविण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया हे जिल्हे रोजगारयुक्त व्हावे यासाठी ही योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे. ही योजना पुढे नेण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी द्यावे
चंद्रपूर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. या महाविद्यालयाचे काम दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सैनिकी शाळेसाठी हवे ७६ कोटी
चंद्रपूर जिल्हयातील सैनिक शाळा ही देशाचा गौरव वाढविणारी एक महत्त्वाची अशी वास्तु आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणारे शुरवीर घडविण्याचे कार्य या शाळेमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहे. या शाळेसाठी आवश्यक निधी मागील दोन वर्षामध्ये शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर्षीच्या फेब्रुवारीमधील पुरवणी मागण्याद्वारे सदर सैनिकी शाळेसाठी ७६ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Web Title: Fund of Rs 175 crore should be provided for the employment plan of Chandrapur, Gadchiroli and Gondia districts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.