प्रहारचा नगर परिषदेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:57 IST2018-01-18T23:57:35+5:302018-01-18T23:57:47+5:30
शहरातील प्रभाग ६ मधील इंदिरानगर व यशवंतनगरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रहार संघटना कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

प्रहारचा नगर परिषदेवर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर: शहरातील प्रभाग ६ मधील इंदिरानगर व यशवंतनगरातील विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी प्रहार संघटना कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मुख्याधिकारी संजय जाधव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
वॉर्डातील विविध समस्या सोडविण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे नागरिकांची गरैसोय होत आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानूसार वॉर्डातील रस्त्यांचे बांधकाम करावे, ओपन स्पेस स्वच्छ करुन सौंदर्यीकरण करून बेंचेस लावावे, अशी मागणी आहे. दरम्यान. मुख्याधिकारी जाधव यांनी प्रहार कार्यकर्त्यांसोबत वॉर्ड नं. ६ मध्ये फिरुन पाहणी केली.
याप्रसंगी प्रहार संघटनेचे वैभव गोरे, सतीश बिडकर, सदाशिव गिरी, महेश देरकर, आकाश वाटेकर, सादीक, मंगेश ठमके, आकाश ठमके, निखील एकरे, मयूर खान, संजय ठेपे, परमेश्वर चव्हाण, विनिती मुदलवार अन्य नागरिक उपस्थित होते.