नागभीड ग्रामपंचायतीवर मोर्चा

By Admin | Updated: March 2, 2016 00:33 IST2016-03-02T00:33:09+5:302016-03-02T00:33:09+5:30

नागभीड ग्रामपंचायती अंतर्गत विविध मागण्यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांच्या नेतृत्वात सोमवारी येथील ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला.

Front of Nagbhid Gram Panchayat | नागभीड ग्रामपंचायतीवर मोर्चा

नागभीड ग्रामपंचायतीवर मोर्चा

विविध मागण्या : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिले निवेदन
नागभीड : नागभीड ग्रामपंचायती अंतर्गत विविध मागण्यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांच्या नेतृत्वात सोमवारी येथील ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला.
शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली. या मोर्चात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यात यावी, अस्वच्छता पसरविणारे खताचे खड्डे तातडीने हटविण्यात यावे, वॉर्ड क्रमांक पाचमधील पुलाचे काम करण्यात यावे, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात यावे, १४ व्या वित्त आयोगातील कामाची त्वरित पूर्तता करण्यात यावी, रहिवासी दाखला नि:शुल्क देण्यात यावा, क्रीडांगणावर विद्युत दिव्यांची सोय करण्यात यावी आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या.
ग्रामपंचायतीवर मोर्चा गेल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य संजय अमृतकर यांनी सरपंच विनय शेंडे आणि ग्रामविकास अधिकारी एस.एन नगराळे यांच्यापुढे मागण्या मांडल्या. मागण्यांचा विचार करून त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संजय अमृतकर, आरिफ मिर्झा, मनीषा निहाटे, कमल ठोंबरे राकेश वाढई यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Front of Nagbhid Gram Panchayat