पालकमंत्र्यांसमोरच कॉंग्रेसच्या विद्यमान व माजी शहराध्यक्षांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:01+5:302021-07-21T04:20:01+5:30

तिवारी आणि नागरकर यांच्यामधील हा वाद काही काळ सुरूच राहिला. दरम्यान दोघांमधील वाद वाढत असल्याचे पाहून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी ...

In front of the Guardian Minister, there is a rift between the current and former city presidents of the Congress | पालकमंत्र्यांसमोरच कॉंग्रेसच्या विद्यमान व माजी शहराध्यक्षांमध्ये खडाजंगी

पालकमंत्र्यांसमोरच कॉंग्रेसच्या विद्यमान व माजी शहराध्यक्षांमध्ये खडाजंगी

तिवारी आणि नागरकर यांच्यामधील हा वाद काही काळ सुरूच राहिला. दरम्यान दोघांमधील वाद वाढत असल्याचे पाहून पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठक संपवित शहर अध्यक्ष रामू तिवारी व ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना सोबत घेऊन चंद्रपूर वीज केंद्राच्या विश्रामगृहाकडे प्रस्थान केले. याबाबत नंदू नागरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याची पुष्टी केली. ते म्हणाले, कॉंग्रेस नगरसेवकांसोबतच ५० मतांनी हरलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवारांनाही खनिज विकास निधी देण्याची आपण मागणी केली होती. मात्र विद्यमान शहर अध्यक्ष ज्यांनी निवडणूकच लढली नाही, अशांना निधी देण्याची मागणी करीत होते. याचा आपण विरोध केला.

याबाबत रामू तिवारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असा कुठलीही खडाजंगी झाली नसल्याचे सांगितले. खनिज विकास निधीच्या वाटपांसबंधी नगरसेविकांची यादी मागितली होती. मी माजी नगरसेवकांची यादी दिली होती. त्यावर नागरकरांनी आक्षेप घेतला. याचा आपणही विरोध केला.

Web Title: In front of the Guardian Minister, there is a rift between the current and former city presidents of the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.