मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: November 20, 2015 00:25 IST2015-11-20T00:25:55+5:302015-11-20T00:25:55+5:30
१ एप्रिल २०१४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुधारीत निर्णयानुसार मासगर्वीयाने सवलत घेतली

मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर मोर्चा
ब्रह्मपुरी : १ एप्रिल २०१४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुधारीत निर्णयानुसार मासगर्वीयाने सवलत घेतली असल्यास खुल्या प्रवर्ग पदासाठी शिफारस केली जाणार नाही. या निर्णयाविरुद्ध व इतर मागण्यांच्या संदर्भात एससी, एस.टी., ओबीसी कृती संसाधन समिती द्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून नायब तहसीलदार राठोड यांना व त्यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
सदर निर्णय म्हणजे घटनादत्त स्वातंत्र्य व समता या मुलभूत अधिकारावर अतिक्रमण आहे. एमपीएससी व युपीएससी परिक्षेत ओबीसी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार व्हावा, ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी युवराज सिडाम, मधुकर जुमनाके, पद्माकर रामटेके, प्रविण फूले, प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)