बल्लारपूर पेपरमिल कामगारांचा व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा

By Admin | Updated: February 1, 2017 00:30 IST2017-02-01T00:30:03+5:302017-02-01T00:30:03+5:30

पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बल्लारपूर पेपरमिल कामगारांनी आज मंगळवारी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला.

Front against the management of Ballarpur Paper Mill | बल्लारपूर पेपरमिल कामगारांचा व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा

बल्लारपूर पेपरमिल कामगारांचा व्यवस्थापनाविरुद्ध मोर्चा

बल्लारपूर : पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या बल्लारपूर पेपरमिल कामगारांनी आज मंगळवारी रस्त्यावर येऊन आपला संताप व्यक्त केला.
बल्लारपूर शहराची जीवनदायिनी असलेली बल्लारपूर पेपरमिल कंपनी मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात आहे. येथील परमंन्ट, डेलिपेड व रोजंदारी कामगारांचे वेतन गेल्या पाच महिन्यापासून थकीत आहे. त्यामुळे कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी येथील बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्त्व राजू झोडे, अ‍ॅड. शैलेश मुंजे, प्रशांत बहिरम व संजय लुटे यांनी केले. हा मोर्चा स्थानिक कादरीया मस्जीद ते कलामंदिर, तीन एक्का गेट, जयभीम चौक, दत्त मंंदिर, जुना बस स्टॅन्ड या मार्गाने जात नगर परिषद येथे विसर्जित करण्यात आले. याप्रसंगी राजु झोडे आणि अ‍ॅड. शैलेश मुंजे यांनी बिल्ट व्यवस्थापनाला त्वरित सर्व कामगारांचे संपूर्ण थकीत वेतन देण्यात यावे. अन्यथा हे आंदोलन अधिकच तिव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. याप्रसंगी प्रशांत बहिरम, संजय लुटे व उमेश कडू यांचेही भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)

आज बल्लारपूर बंद
बल्लारपूर पेपरमिलमधील कामगाराच्या थकीत असलेल्या वेतनाविरुद्ध बल्लारपूर इंडस्ट्रिज मजदूर संघातर्फे आज बल्लारपूर बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदला स्थानिक बल्लारपूर बिझनेस असोसिएशन, आॅटो असोसिएशन, पानठेला असोसिएशन या संघटनेने समर्थन दिले आहे. या बंदला शहरातील सर्व शाळा व कॉलेज बंद करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Front against the management of Ballarpur Paper Mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.