राकाँचा महागाई विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:21 IST2018-06-01T22:21:20+5:302018-06-01T22:21:29+5:30

शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद समोरील जिल्हा मध्यवर्ती बँक पेट्रोल पंप पटांगणापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Front against inflation, inflation | राकाँचा महागाई विरोधात मोर्चा

राकाँचा महागाई विरोधात मोर्चा

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भाव वाढलेल्या वस्तूंची शवयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाच्या धोरणाविरोधात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा परिषद समोरील जिल्हा मध्यवर्ती बँक पेट्रोल पंप पटांगणापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
देशात आणि राज्यात भाजपा सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झालीत. या चार वर्षाच्या काळात जनसामान्याच्या समस्या सोडविण्यात शासन पूर्णपणे असफल ठरलेले आहे. चार वर्षांपासून पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव दिवसागनिक वाढतच आहेत. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या मानाने योग्य ती किंमत नसल्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे. अजूनपर्यंत शेतकºयांची पुर्णपणे कर्जमाफी झालेली नाही. सामान्य जनता विविध समस्येला सामोरे जात आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात शुक्रवारी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाववाढ झालेल्या वस्तुची शवयात्रा काढण्यात आली. आज भाववाढी विरोधात सर्वांना जागे होण्याची वेळ आलेली आहे. आज आपण भाववाढीविरोधात आवाज उठविला नाही तर समोरही अशीच भाववाढ होत राहून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागणार आहे. याचा निषेध व भाववाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जनसामान्यांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेभुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, गटनेते दीपक जैयस्वाल, हिराचंद बोरकुटे, राजीव कक्कड, संजय वैद्य आदी उपस्थित होते.

Web Title: Front against inflation, inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.