शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्ण बस सेवा सुरू
By Admin | Updated: June 25, 2016 00:45 IST2016-06-25T00:45:53+5:302016-06-25T00:45:53+5:30
शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य शिवसेना वरोरा तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा ...

शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्ण बस सेवा सुरू
वरोरा : शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य शिवसेना वरोरा तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा शहरातून आठवड्यातून तीन दिवस रुग्णांकरिता मोफत बस सेवा २३ जूनपासून सुरू करण्यात आली.
गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मोफत रुग्ण बस सेवा वरोरा ते विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवसात रुग्णांना मोफत बस सेवा पुरविण्यात येणार आहे. रुग्णांची बस सकाळी ७.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथून निघणार आहे. वनोजा, पांझुर्णी, वंधली, माढेळी, नागरी, लाडकी, मानोरा फाटा, तातेफळ, कुंभी, हिंगणघाट, धोतरा या मार्गाने सावंगी मेघे येथे पोहचणार आहे. २३ जूनला सकाळी आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथे हिरवी झेंडी दाखवून मोफत रुग्ण बस सेवेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी न.प. पाणी पुरवठा सभापती पुरुषोत्तम खिरटकर, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, शिवसेना शहर प्रमुख निलेश भालेराव, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार, अॅड. फुलझेले, बंडू देवूलकर, बाजार समिती उपसभापती राजू चिकटे, सपन डे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जी.डब्ल्यू. भगत, रुग्णालय प्रतिनिधी सुभाष दांदळे, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी सुनील साकळे, सचिन शेंडे, विजय खैरे, किशोर खोंड, अय्युब पठाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)