पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:52 IST2019-06-12T00:52:13+5:302019-06-12T00:52:54+5:30

पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

Free the MIDC route at Pomburna | पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नांचे फलित : विकासाला चालना व रोजगाराची संधी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्नांमुळेच एमआयडीसी निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) खासगी १०२.५० हे. आर क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये जमिनीचे नुकसान भरपाईचे दर निश्चितीबाबत प्रस्ताव उच्चाधिकार समितीपुढे सादर करण्यात आला होता. १९ आॅक्टोबर २०१८ रोजी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अनुषंगाने ११ जून २०१९ रोजी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे कक्ष अधिकारी नंदु निस्तरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सदर क्षेत्राच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रासाठी १८७. ६७ हे.आर. क्षेत्र अधिसूचित करण्यात आले होते. पैकी कोसंबी (रिठ) येथील १०२.५० हे.आर. क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली. त्यापैकी ५४.५२ हे.आर क्षेत्रातील ४९ खातेदारांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. शासनाची मान्यता मिळाल्याने आता एमआयडीसी स्थापनेच्या प्रक्रियेला गती येणार आहे.

दिव्यांगांना आज स्वयंचलित सायकल वितरण
जि.प. समाजकल्याण विभागाच्या वतीने बुधवारी जि. प. सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिव्यांगांना सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना बॅटरीवर चालणाºया स्वयंचलित तीन चाकी सायकलच्या वितरणाचा पहिला कार्यक्रम मूल येथे शनिवार पार पडला होता. दिव्यांग व्यक्ती व कुटुंबियांना त्रास सहन करावा लागतो. साधी तीनचाकी सायकल चालवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अशा सर्व दिव्यांगांना स्वयंचलित सायकल वाटपाचा संकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

स्वंयरोजगाराकडे तालुक्याची वाटचाल
पोंभुर्णा पोल्ट्री कंपनी ही आदिवासी महिलांची महाराष्ट्रातील पहिली कुक्कुटपालन व्यवसाय करणारी संस्था पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे स्थापन झाली आहे. तालुक्यात दुग्ध व्यवसाय प्रकल्प, टूथपिक तयार करण्याचा प्रकल्प, बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट, मधुमक्षिका पालना, कृषी उद्योग, चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत आयटीसी कंपनी, बांबू विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अगरबत्ती उत्पादन प्रकल्प या प्रकल्पांमुळे या तालुक्याची वाटचाल रोजगार व स्वयंरोजगाराकडे आहे.

Web Title: Free the MIDC route at Pomburna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.