गृह विलगीकरणातील गरजूंना ‘हिरकणी’तर्फे मोफत भोजन व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:58+5:302021-04-27T04:28:58+5:30
या संस्थेची भोजन समिती गरजूंची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. हे ...

गृह विलगीकरणातील गरजूंना ‘हिरकणी’तर्फे मोफत भोजन व्यवस्था
या संस्थेची भोजन समिती गरजूंची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत भोजन पुरविण्याचे काम करीत आहे. हे काम लोकसहभागातून होत आहे. त्याकरिता लोक स्वयंस्फूर्तीने आर्थिक सहयोग देत आहेत. हे कार्य संस्थेने एक आठवडापर्यंतच करण्याचे ठरविले होते. परंतु, गरजूंची वाढत जात असलेली संख्या, त्यांच्या अडचणी आणि लोकांकडून या कामी मिळत असलेली आर्थिक मदत सोबतच या कार्यात त्यांची साथ बघता हे मदत कार्य अविरत सुरू ठेवण्याचे ठरले. संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर मंजूषा कल्लूरवार यांच्या मार्गदर्शनात स्नेहा भाटिया, सिमरन सय्यद, संजना मूलचंदानी, स्मिता चनाप, योजना गंगशेट्टीवार, रोहिणी नंदग्रामवार, आदी परिश्रम घेत आहेत. यासोबतच येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दूरवरून येणाऱ्या गरजू रुग्णांनाही ही संस्था मोफत भोजन देण्याचे काम करीत आहे. बाधितांना प्राणवायू (ऑक्सिजन) सिलिंडरची मदतही या संस्थेकडून मदतही या संस्थेकडून केली जात आहे.