गरजू रुग्णांना मोफत भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:02+5:302021-04-25T04:28:02+5:30
घुग्घुस : जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील रुग्ण दवाखान्यात भरती होत असून, टाळेबंदीमुळे त्यांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला भोजन मिळत ...

गरजू रुग्णांना मोफत भोजन
घुग्घुस : जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील रुग्ण दवाखान्यात भरती होत असून, टाळेबंदीमुळे त्यांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला भोजन मिळत नाही. अशा लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये म्हणून येथील जि.प. मराठी कन्या शाळेत कार्यरत शिक्षक महेंद्र पाल यांनी रुग्णांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला मोफत अन्नदान करण्याचा उपक्रम चंद्रपुरात सुरू केला आहे.
आतापर्यंत बऱ्याच गरजू रुग्णांना भोजनाची व्यवस्था केली आहे. चंद्रपूर येथील कोणत्याही दवाखान्यात रुग्ण भरती असेल किंवा टाळेबंदी असल्यामुळे कुणाला भोजनाचा डबा मिळत नसेल, अशा रुग्णांना व रुग्णासोबत असणाऱ्या व्यक्तीला दोन्ही वेळचा भोजन डबा मोफत दवाखान्यात पोहोचता केला जात आहे. गरजू रुग्णांनी किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींनी शिक्षक महेंद्र पाल रा. चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा.