मोफत अन्न-धान्य वाटपाला सावली व सिंदेवाहीतून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:31+5:30

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.

Free food grains distribution start from Sawali and Sindewahi | मोफत अन्न-धान्य वाटपाला सावली व सिंदेवाहीतून सुरुवात

मोफत अन्न-धान्य वाटपाला सावली व सिंदेवाहीतून सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देगोरगरिबांना दिलासा : गरजवंतांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्र्याचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लाकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंत, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून ब्रम्हपुरीनंतर सावली व सिंदेवाहीतील गरजू, शेतमजूर, कष्टकरी, गरीब कुटुंबाना १५ दिवस पुरेल इतके अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून रविवारी तहसिल कार्यालय सावली व सिंदेवाहीच्या परिसरात शुभारंभ करण्यात आला.
निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही. लाकडाऊनमुळे जिल्ह्यातील स्थलांतरित कामगार, गरजवंत, हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून मोफत अन्न धान्य वाटपाचा उपक्रम सुरु केला आहे. नजरचुकीने कोणी राहिले असेल ज्यांना धान्य पॉकेट मिळाले नाही. त्यांनी संपर्क साधा जिल्ह्यातील कुणाचीही उपासमार होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून सावली व सिंदेवाही तालुक्यातील गरजवतांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या शुभारंभाप्रसंगी सावली येथे नगराध्यक्ष नगरपंचायत विलास यासलवर, सभापती पंचायत समिती विजय कोरेवर, तहसीलदार पी.के.कुमरे, सरपंच राजू सिद्धम, दिनेश चिटनूरवार, ठाणेदार बाळासाहेब खाडे, मुख्याधिकारी मंजुषा वाजळे तसेच सिंदेवाही येथे नगराध्यक्ष नगरपंचायत आशाताई गंडाते, सदस्य जिल्हा परिषद रमाकांत लोंढे, स्वप्नील कावळे, नरेंद्र भैसरे, अरुण कोलते, सिमताई साखरे, राहुल पोरेड्डीवार, विरेंद्र जैस्वाल उपस्थित होते. तर यावेळी दिव्या संघपाल दुधे, मालू बंडू मेदपल्लीवार, मिनाक्षी राऊत, शालू मेदपल्लीवार यांच्यासह ३० तर सिंदेवाही येथे जयप्रकाश बबन शेंडे, रोशनी चारसिंग ताक, शिफा स्लिम, सुरेश पस्तंवार यांच्यासह ३० लाभार्थ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांना खºया अर्थाने आधार देण्याचे काम पालकमंत्रीविजय वडेट्टीवार करीत आहेत.

प्रति कुटूंब दहा किलो तांदूळ
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून देश वाचवण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाकडाऊन केले. संपुर्ण लॉकडाउनमूळे वाहतूक थांबली, कामधंदे मिळणे थांबले, जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. एकूणच हातावर पोट असणाºया आणि गोर-गरीब जनतेवर याचा पर्यार्याने प्रतिकूल परिणाम होत आहे. मग ज्याचे हातावर पोट आहे, त्यांचे काय? त्यांच्या घरात चूल कशी पेटणार अशा परिस्थीतीत त्यांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत ब्रम्हपुरीनंतर आज सावली आणि सिंदेवाहीत प्रति कुटूंब १० किलो तांदूळ,दोन किलो तूर डाळ, एक किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, एक किलो मीठ, एक साबण या जीवनावश्यक वस्तूचे किट मोफत वाटप करण्यात आले. वाटप करताना शासनाने लावलेल्या कलम १४४ चे पालन करण्यात आले.

Web Title: Free food grains distribution start from Sawali and Sindewahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.